breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ग्राहकराजाची व्यवहारांमध्ये फसवणूक योग्य नाही – पी. बी. जोशी

ग्राहक हक्क संरक्षण दिनानिमित्त वेबिनारला प्रतिसाद 

पुणे | प्रतिनिधी

आयोगापुढील वाढत्या तकारी ही जागरुकतेच्या दृष्टीने समाधानाची बाब असली तरी ग्राहकराजाची अनेक व्यवहारांमध्ये फसवणूक होत असते हे योग्य नाही. ग्राहक हक्कांची नोंद सर्वानी घेतली पाहिजे ‘,असे प्रतिपादन महाराष्ट्र ग्राहक तकार निवारण आयोग (मुंबई) चे न्यायीक सदस्य पी.बी. जोशी यांनी केले. 

 ग्राहक हक्क संरक्षण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एके. के. न्यू लॉ अकॅडमी तर्फे ‘ग्राहक संरक्षण कायदा २०१९ आणि ग्राहकांचे हक्क ‘ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते . २४ डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता हा वेबिनार  झाला. त्यात  राज्य ग्राहक तक्रार निवारण  आयोगाचे न्यायिक सदस्य  पी. बी. जोशी, जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष उमेश जवळीकर, डॉ. पी. ए. इनामदार, आबेदा इनामदार सहभागी झाले.

पी.बी. जोशी म्हणाले की, ‘ग्राहक तकार निवारण ही सद्यकालीन संकल्पना नसून आर्य चाणक्य काळापासून भारतीय इतिहासाने ग्राहक हक्कांची नोंद घेण्यात आली आहे.  ग्राहक हक्क संरक्षण कायदा 2019 मधील अनेक महत्वपूर्ण तरतुदीं असून ग्राहकांना त्याची माहिती करून देणे आवश्यक आहे . आयोगापुढील वाढत्या तकारी ही जागरुकतेच्या दृष्टीने समाधानाची बाब असली तरी ग्राहकराजाची अनेक व्यवहारांमध्ये फसवणूक होत असते हे योग्य नाही’.

जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोगाचे  अध्यक्ष उमेश जावळीकर म्हणाले,’ ग्राहक हक्क संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहक हक्क  मधील नविन बदलांकडे लक्ष वेधले पाहिजे .या कायद्याचा समाजाला कसा उपयोग करुन देता येईल याकडे  विद्यार्थ्यांनी लक्ष  द्यावे.   

अध्यक्षस्थानावरून बोलताना  डॉ. पी. ए. इनामदार  म्हणाले की, महात्मा गांधीनी मांडलेली ग्राहक हक्काची संकल्पना अधिक चांगल्या पध्दतीने स्विकारली गेली पाहीजे व ग्राहक हक्क संरक्षण कायद्याने समाजात  अधिक सजगता यावी. अबेदा  इनामदार, म्हणाल्या ,’ग्राहक हक्क संरक्षण ही आजच्या बाजार  यंत्रणेइतकीच गरजेची बाब असून समाजामध्ये स्वतच्या हक्काविषया अजूनही कमी जाणीव आहे . त्यादृष्टीने पावले उचलायची गरज आहे.’

प्राचार्य डॉ रशीद शेख यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता गुप्ता यांनी केले. तर हों, मनिषा मित्तल यांनी मान्यवरांचे आभार मानले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button