breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

१ जानेवारीपासून FASTAG बंधनकारक; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली – टोलनाक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने आणलेली फास्टटॅग योजना १ जानेवारीपासून बंधनकारक करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात बोलताना गडकरींना ही घोषणा केली. १ जानेवारी २०२१पासून प्रत्येक वाहनाला FASTAG बंधनकारक असणार आहे. FASTAGची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील, असे ते म्हणाले.

वाचा :-तामिळनाडू विधानसभेसाठी रजनीकांत-कमल हसन एकत्र? वाचा काय म्हणाले कमल हसन

काय आहे FASTAG संकल्पना?

FASTAG ही संकल्पना २०१६पासून सुरू करण्यात आली. चार अधिकृत बँकांनी सुमारे लाखभर वाहनधारकांना FASTAG वितरित केले. २०१७ मध्ये हाच आकडा वाढून सात लाखांपर्यंत गेला. आणि २०१८च्या अंती हा आकडा ३४ लाखांवर जाऊन पोहोचला. नोव्हेंबर २०२०मध्ये रस्तेवाहतूक मंत्रालयाकडून १ जानेवारी २०२१पासून FASTAG बंधनकारक करण्याचे निर्देश प्रसिद्ध करण्यात आले. १ डिसेंबर २०१७ च्या आधी विक्री झालेल्या वाहनांसाठीही FASTAG बंधनकारक असणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, फास्टॅग अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्या संबंधीचा एक sms त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅगची वॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत.

FASTAG साठी आवश्यक कागदपत्र-

  • वाहनाचं नोंदणीचं पत्र
  • वाहनाच्या मालकाचा फोटो
  • KYCसाठी आवश्यक कागदपत्र
  • वास्तव्याचा दाखला
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button