breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
गोव्यात होणाऱ्या ‘सनबर्न’ च्या तारखा जाहीर
गोव्यात होणाऱ्या ‘सनबर्न” या कार्यक्रमाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या आदल्या काही दिवसांत हा कार्यक्रम होणार आहे. देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या ‘सनबर्न” या कार्यक्रमाची तरुणाई आतुरतेने वाट पाहत असते. प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर महिन्यात हा कार्यक्रम गोव्यात होतो आणि राज्य सरकारला या कार्यक्रमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. डिसेंबर महिन्यात २७ ते २९ रोजी हा कार्यक्रम होणार असून, लवकरच हा कार्यक्रम आयोजकांकडून त्यांच्या तिकीट बुकिंगला सुरवातही होणार आहे. त्यामुळे सध्या या कार्यक्रमासाठी लगबग सुरु आहे.