breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

गोरेगावच्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा – भाजप

मुंबई | गोरेगाव येथील नेस्को मैदानावर करोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या भव्य कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपनं केला आहे. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या तब्बल २३ वस्तूंची ११ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर महापालिकेनं गुपचूप काढली असून त्यात तब्बल सहा कोटींचा घोटाळा असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. कोविड सेंटरचं काम कंपन्यांच्या सीएसआर फंडातून होणार असल्याचं महापालिकेनं सुरुवातीला सांगितलं होतं. कोविड सेंटरची वर्क ऑर्डर मिळवण्यात यशस्वी झालेल्या रोमेल बिल्डरनं स्वत:च्या वेबसाइटवरही सीएसआर फंडातून आपण हे काम करत असल्याचं म्हटलं आहे. पण प्रत्यक्षात महापालिकेनं त्यासाठी ११ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर दिली आहे, असा दावा कोटेचा यांनी केला.

कोविड सेंटरमधील २३ वस्तूंची ही वर्क ऑर्डर आहे. त्यातील प्रत्येक वस्तूसाठी महापालिकेनं मोजलेले भाडे आणि प्रत्यक्षात विक्रीसाठी लागणारे पैसे यांची तुलनात्मक आकडेवारीच कोटेचा यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button