breaking-newsराष्ट्रिय

गोध्रात पार्किंगवरून दोन समुदायांत दंगल – 6 जखमी

गोध्रा (गुजरात) – पार्किगवरून गोध्रा येथे दोन समुदायात दंगल होऊन त्यात सहाजण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. रस्त्यावर मोटर सायकल उभी करण्यावरून या वादाला सुरुवात झाली. एका रिक्षावाल्याने रस्त्यात मोटर सायकल उभी करायला हरकत घेतली. त्यावरून मोटर सायकलस्वार आणि रिक्षावाला यांच्यात बोलाचाली झाली व पुढे त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. मोटर साकलस्वार व रिक्षावाला दोघेही वेगवेगळ्या समुदायाचे होते. काही वेळातच त्यांच्या समर्थकांचा घोळका जमा झाला आणि त्यांच्यात झगडा सुरू झाला. हाणामारी आणि दगडफेकीत सहाजण जखमी झाले.

दंगल आटोक्‍यात आणण्यासाठी पोलीसांना अश्रुधुराचा उपयोग करावा लागला. नंतर त्या भागात पोलीस दल तैनात करण्यात आले. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही,. असे गोध्रा बी विभाग पोलीस ठाण्याचे प्रभारी एमसी सॅंग्तियांनी यांनी सांगितले.

सन 2002 मध्ये अयोध्येहून येणाऱ्या रामभक्तांच्या ट्रेनला आग लावण्याच्या प्रकरणामुळे गोध्रा संपूर्ण देशभर चर्चेत आले होते. त्यानंतर झालेल्या दंगलींमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button