breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत रमजाननिमित्त रोजा इफ्तार पार्टी उत्साहात 

  • सामाजिक सलोख्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा उपक्रम

पिंपरी –  मुस्लीम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्या निमित्त आमदार महेश लांडगे स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि शहर मुस्लीम महासंघातर्फे भोसरीतील इंद्रायणी मंगल कार्यालयात सोमवारी (दि.११) सायंकाळी 7 वाजता मोठ्या उत्साहात रोजा इफ्तार पार्टी करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुस्लिम बांधवांनी मौलाना फिरोज अझिझी, मौलाना आझाद, मौलाना मारुफ, मौलाना अबरार यांच्या बरोबर नमाज पठण केले. या प्रसंगी महापौर नितीन काळजे, माजी महापौर व भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, माजी स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे, नगरसेवक सागर गवळी, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, वसंत बोराटे, सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, भिमा फुगे, कुंदन गायकवाड, यशोदा बोईनवाड, तुषार हिंगे, विलास मडेगिरी, सारिका लांडगे, प्रभागाचे स्वीकृत सदस्य गोपीकृष्ण धावडे, दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, संतोष मोरे, पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, भिराव शिंगाडे, दिनकर ओताडे, फजल शेख, झिशान सय्यद, अजहर खान, संदीप बेलसरे, अस्लम शेख आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, “आमदार महेश लांडगे दरवर्षी सातत्यपूर्ण इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. त्या निमित्ताने रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून आलो आहे. पुन्हा ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यामध्ये येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये संविधानाचे पालन करणा-या प्रत्येक नागरिकांसाठी व समुदायासाठी कटिबध्द आहेत. सर्वांना शिक्षण आणि रोजगार मिळावा. या दृष्टीने सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच, अल्पसंख्याक मुस्लीम बांधवांसाठी विविध हितकारी निर्णय भाजप सरकारच्या काळात घेण्यात येत आहेत”.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, सामाजिक एकोपा व सलोखा जपण्यासाठी यांसारख्या उपक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे. मुस्लीम बांधवांना त्यांच्या पवित्रा रमजान सणाचे औचित्य साधून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. तसेच, इफ्तार पार्टीचे नियोजन करणा-या आमदार महेश लांडगे स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड शहर मुस्लीम महासंघाचेही त्यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button