breaking-newsराष्ट्रिय

गेल्या तीन वर्षात सीमेपलिकडील तस्करीत वाढ

नोंद झालेल्या गुन्ह्यांची गृहमंत्रालयाकडील आकडेवारी 

नवी दिल्ली- गेल्या तीन वर्षांमध्ये देशाच्या विविध सीमांपलिकडून अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि पशूधनाची तस्करी वाढली आहे. तसेच तस्करीच्या या प्रकरणांमध्ये अटक होणाऱ्या तस्करांची संख्याही वाढली आहे, अशी माहिती पुढे आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने संकलित केलेल्या गुन्ह्यांच्या माहितीच्या आधारे पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि म्यानमारच्या सीमांवरून होणाऱ्या तस्करीमध्ये वाढ झाली आहे. 2015 मध्ये तस्करीची 19,537 प्रकरणे उघड झाई होती, ती 2017 मध्ये 31,593 झाकी आगेत, 2016 मध्ये याच तस्करीची 23,198 प्रकरणे नोंदवली गेली होती.

भारत आणि या अन्य देशांबरोबर चीन दरम्यान 15 हजार किलोमीटर लांबीची सीमारेषा लाभली आहे. या सीमेवरल तस्करी रोखण्यासाठी लष्कराच्या विविध तुकड्यांकडून सततचा पहारा असतो. या सीमेवर पकडल्या गेलेल्या तस्करांच्या संख्येमध्ये 2015 ते 2017 दरम्यान वाढ झाली आहे. 2015 मध्ये असे 1,501 तस्कर पकडले गेले होते. 2016 मध्ये 1.893 आणि 2017 मध्ये 2.299 तस्करांना पकडण्यात यश आले होते. यापैकी बहुतेक तस्करीचे प्रकार बांगलादेशच्या सीमेवर घडले आहेत. बांगलादेशच्या सीमेवर या तीन वर्षात अनुक्रमे 656, 751 आणि 633 जणांना अटक करण्यात आली. तर नेपाळच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर 2015 मध्ये 1,158, 2016 मध्ये 1,173 आणि 2017 साली 1,563 तस्करीचे प्रकार घडले.

आंतरराष्ट्रीय सीनेवर 2015 साली तस्करी होत असलेली 1 लाख 63 हजार 180 जनावरे पकडली गेली होती. 2016 साली जनावरांची ही संख्या वाढून 1 लाख 71 हजार 869 इतकी झाली होती. गेल्यावर्षी मात्र हा आकडा 1 लाख 30 हजार 806 पर्यंत कमी झाला होता. तस्करीची प्रकरणे आणि अटक होणाऱ्यांच्या संख्येमध्ये हळूहळू वाढ होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तस्करांचे तस्करीच्या प्रयत्नांबरोबरच देखरेख करणाऱ्या जवानांच्या क्षमतांमध्येही वाढ झाली आहे. या माहितीमध्ये चीनबरोबरच्या 3 हजार किलोमीटरच्या सीमेवरील तस्करीबाबतची माहिती उपलब्ध नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button