breaking-newsराष्ट्रिय

प्रभू रामचंद्र हे हिंदूंचेच नाही, मुस्लिमांचेही पूर्वज-रामदेवबाबा

प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत, त्यामुळे अयोध्येत राम मंदिर होणारच. अयोध्येत राम मंदिर होणार नाहीतर काय मक्का मदिना किंवा व्हॅटिकनमध्ये होणार का? असा प्रश्न विचारत योगगुरू रामदेवबाबा यांनी राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.

ANI

@ANI

Yog Guru Ramdev: Ram Mandir Ayodhya mein nahi banega to koi Mecca-medina aur Vatican City mein to banne waala nahin hai. Aur ye nirvivadit satya hai ki Ram ki janmabhoomi Ayodhya hai aur Ram matra Hindu hi nahi musalmano ke bhi purvaj hain. (08.02.19)

93 people are talking about this

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश काढा अशी मागणी केली जाते आहे. शिवसेनेनेही हीच मागणी केली होती. तर देशभरातल्या साधू संतांनीही हीच मागणी केली आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अध्यादेश काढण्याचा प्रश्नच नाही असं पंतप्रधान मोदींनीही स्पष्ट केलं आहे. तरीही राम मंदिराचा प्रश्न चर्चिला जातो आहे. राम मंदिर नाही तर मत नाही असेही फलक लावण्यात आले होते.

विरोधकांनी तर राम मंदिराचं राजकारण भाजपा फक्त मतांसाठी करत असल्याचा आरोप केला. राम मंदिर अयोध्येतच होणार असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. अशात आता बाबा रामदेव यांनी प्रभू रामचंद्र हे मुस्लिमांचेही वंशज होते असं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटले रामदेवबाबा?

प्रभू रामचंद्रांचं मंदिर हे अयोध्येतच होणार. अयोध्येत नाही तर काय व्हॅटिकन सिटी किंवा मक्का मदिनाला होणार का? अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे हे निर्विवाद सत्य आहे. प्रभू राम हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही वंशज आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button