breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पालिसांकडून जप्त, दोघेजण ताब्यात

पिंपरी (महा ई न्यूज) – राज्यभरात गुटखा विक्रीस बंदी असताना पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पोतून गुटखा सपलाय करताना जप्त करण्यात आला आहे. गुटख्यासह टेम्पो असा 47 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण (ता. खेड) येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्लायलयाच्या समोर शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

टेम्पो चालक अबुजार जमालउद्दीन शेख (रा. वसई, मुंबई) व अरुण रावसाहेब खोत (वय ३२, सध्या रा, बिबवेवाडी, पुणे, मूळ रा. कासेगाव पंढरपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या गुटख्याची मोजदाद रात्री उशिरापर्यंत पूर्ण करण्यात आली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार, अजय भापकर, ज्ञानेश्वर सातकर, शेखर कुलकर्णी व त्यांच्या सहकार्यांच्या पथकाने पुणे नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात सापळा लावला होता. त्यावेळी संशयीत टेम्पोवर कारवाई करण्यात आली. चाकण परिसरात मागील वर्षभरातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून या गोरखधंद्याची पाळेमुळे खोदण्याची गरज निर्माण झाली आहे.

गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून पुणे जिल्ह्यात गुटखा आणला जाणार असल्याची माहिती पोलीस नाईक अजय भापकर यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर चाकण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पुणे नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकात सापळा लावला. मात्र, टेम्पो चालकाने चौकातून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून संबंधित टेम्पो भाग्यलक्ष्मी कार्यालयाच्या समोर पकडला असता त्यात गुटखा मिळून आला. तीन महिन्यांपूर्वी (13 जुलै 2018) सुद्धा पोलीस नाईक भापकर यांनीच गोपनीय माहिती मिळवून 17 लाखांचा गुटखा पकडून दिला होता. चाकणमध्ये मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या कारवाईत सुमारे अडीच कोटींचा गुटखा मिळून आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button