breaking-newsताज्या घडामोडीपुणे

गिरीश बापटांना उमेदवारी जवळपास निश्चित !

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 2 दिवसात त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बापट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुण्याचे विद्यमान भाजप खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे.

भाजपने अद्याप लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत अनेक नावांवर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र या नावांची घोषणा अद्याप झालेली नाही. भाजप आपली उमेदवार यादी कधी जाहीर करणार याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. मात्र बंडखोरीच्या भीतीने भाजपने हळूहळू पावलं टाकणं पसंत केलं आहे.

तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने मात्र उमेदवार यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील 5 तर राष्ट्रवादीने 15 नावं जाहीर केली आहेत. मात्र शिवसेना भाजपने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. टीव्ही 9 मराठीला मिळालेल्या माहितीनुसार भाजपने 7 नावं जवळपास निश्चित केली आहेत. त्याबाबत अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button