TOP Newsताज्या घडामोडीपुणे

कात्रज घाटात एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

कात्रज घाटात एसटी बसच्या धडकेने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी युवक गंभीर जखमी झाला. अमोल टकले (वय १८, रा. भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र पवन सुभाष जाधव (वय २२, रा. भवानी पेठ) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही वेळ कात्रज घाटातील वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

दुचाकीस्वार अमोल आणि त्याचा मित्र पवन कात्रज घाटातून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुण्याकडे येत होते. भिलारेवाडीजवळ एसटी बसने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार अमोलचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या पवनला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button