breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Video: महापालिकेच्या जून्या – नव्या कर्मचारी महासंघात जूंपली; विविध मागण्यांसाठी निदर्शने

पिंपरी |महाईन्यूज|

गणपुर्ती नसतानाही घेतलेली सभा बेकायदेशीर आहे. तर सध्याच्या कार्यकारिणीने तीन वर्षाची घेतलेली मुदतवाढीचा निर्णय चुकीचा आहे. यासह कर्मचा-यांच्या विविध प्रश्नावरुन महापालिका कर्मचारी महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत (शनिवारी) जोरदार राडा झाला. मात्र, कर्मचारी महासंघाने विशेष लेखापरीक्षण करुन त्यातील त्रुटीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, यासह अन्य विविध विषयाला मंजुरी दिली. परंतू, विरोधी सभासदांना सभागृहात जाण्यास पोलिसांनी अटकाव केल्याने त्यांनी जोरदार निदर्शने केली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे होते. काही सभासदांनी प्रत्यक्ष, तर काहींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदविला. नवीन कार्यकारिणीस मुदतवाढ देणे, संघटनेच्या मागील लेखापरिक्षणातील निर्णयाबाबत विशेष लेखापरीक्षण करणे, महासंघ मासिक वर्गणी दहा रुपये कपात करणे आदी विषय विषयपत्रिकेवर होते. त्याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिल्याने सर्व विषय मंजूर झाले.

शेकडो सभासद गेटच्या बाहेर उभे होते, आम्हाला प्रेक्षागृहामध्ये प्रवेश करण्यास बंदी केली, असा आरोप त्यांनी केला. सभास्थळी जाण्यास केलेला अटकाव यासह विविध मागण्यांसाठी विरोधी गटाने निदर्शने केली. आरोग्य कर्मचाऱ्यांचे थंब कधी बंद होणार? मेडिकलचे मालक आता तुम्ही कसे? 2016 नंतरच्या कर्मचाऱ्यांचे काय? प्रोत्साहन भत्ता 300 ऐवजी 150 का केला?, अशा मजकुराचे फलक हातात घेतले होते.

”कार्यकारिणीच्या मुदतवाढीबाबत घटनादुरुस्ती झालेली आहे. त्यानुसार हा विषय सभेपुढे होता. विरोधक खोटे आरोप करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सभा शासनाने घालून दिलेल्या सूचनांनुसार पार पडली आहे. सभेला अनेक सभासद उपस्थित होते. कोरोनामुळे सर्वांना उपस्थित राहता येणे शक्‍य नसल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिगची व्यवस्था केली होती.”

  • अंबर चिंचवडे, अध्यक्ष, कर्मचारी महासंघ
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button