गांधीजींचा चष्मा अडीच कोटीला अमेरिकन व्यक्तीने घेतला विकत
लंडन – महात्मा गांधी यांच्या सोनेरी चष्म्याची तब्बल २.५५ कोटी (२ लाख ६०हजार पौंड) रुपये अशा रेकॉर्डब्रेक किंमतीला विक्री झाली आहे. हा चष्मा एका अमेरिकन व्यक्तीने विकत घेतला आहे. हा ऐतिहासिक चष्मा महात्मा गांधीजींना १९०० साली भेट म्हणून देण्यात आला होता.असे सांगितले जात आहे.
या चष्म्याचा ऑनलाईन लिलाव करण्यात आला. हा चष्मा खरे तर १० हजार ते १५ हजार पौंडपर्यंत विकला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र ऑनलाईन या चष्म्याची इतकी वाढत गेली की या विक्रमी किंमती पर्यंत पोहचली. ईस्ट ब्रिस्टल लिलावाचा बोलीकर्ता अँडी स्टोव यांनी लिलाव संपताना सांगितले की , या लिलावाने एक ऐतिहासिक मापदंड निर्माण केला आहे. यासाठी अमेरिका , रशिया , कॅनडा , भारत , कतार या देशांतील बॉलिदारांसह जगभरातील लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.
दरम्यान, या चष्म्याच्या पूर्वीच्या मालकाने सांगितले की, ही रक्कम मी आणि माझी मुलगी विभागून घेणार आहे. हा चष्मा माझ्या वडिलांच्या काकाने १९१० ते १९३०दरम्यान ते दक्षिण आफ्रिकेत पेट्रोलियम कंपनीत कामाला असताना दिला होता.