breaking-newsताज्या घडामोडी

गरीबांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची आमदार प्रकाश गजभियेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

नागपूर । महाईन्यूज । प्रतिनिधी

मानव सेवा हाच श्रेष्ठ धर्म आहे हे जाणून राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी नागपुर शहरातील जवळपास ५ हजार गरीब उपाशी जनतेला अन्नधान्य वितरित करून एक आदर्श घडविला आहे.

हातावर पोट असणाऱ्या व रस्त्यावर झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या जेवणाची सोय कशी होणार या काळजीने हैराण झालेल्या आमदार प्रकाश गजभिये यांनी नागपूर येथील गरीब लोकांना दिलासा दिला शिवाय घाबरण्याचे कारण नाही आम्ही गरीबांच्या पाठीशी आहोत असा विश्वासही सर्वांना दिला.

कोरोना व्हायरसमुळे गरीबांवर अशी वेळ आली असून याकरिता आमदार प्रकाश गजभिये यांनी शनिवारी नागपूरचे जिल्हाधिकारी  ठाकरे यांची एका शिष्टमंडळासमवेत भेट घेत गरिबांच्या समस्येविषयी चर्चा केली.

सर्व गरीबांना मोफत अन्नधान्य द्या त्यांना औषधे,भाजीपाला,किराणा व जगण्यासाठी जीवनावश्यक वस्तु उपलब्ध करून द्या. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना एका  दिवसात रेशनकार्ड तयार करुन द्या. मोफत सॅनिटायझर, साबण, डेटॉल उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button