breaking-newsपुणे

गणपती मंडळाची कमान उभारण्याच्या कारणातून वाद ; एक जण जखमी

 गणपती मंडळाची कमान उभारण्यावरून झालेल्या मारहाणीमध्ये एकजण जखमी झाल्याने एकाला अटक करण्यात आलेली आहे. ही घटना काल(दि.9) कृष्णानगर, महमदवाडी येथे दुपारी 12 च्या सुमारास घडली.

तानाजी राजाराम गायकवाड(वय 36, रा.महंमदवाडी )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी संतोष जाधव (वय 27, रा. महमदवाडी ) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष जाधव व त्यांचा भाऊ सागर जाधव तसेच मंडळाचे काही कार्यकर्ते त्यांच्या गणपती मंडळाच्या मंडपा समोर उभे होते. आरोपी तानाजी हा त्याच्या गणपती मंडळाची मनपाची कमान फिर्यादी यांच्या कमानीसमोर लावत होता. त्यामुळे संतोष यांनी त्यांच्या कमानी समोर कमान लावू नको असे सांगितले त्यामुळे चिडून तानाजीने संतोष यांना शिवीगाळ व लाकडी दंडक्याने मारहाण करून जखमी केले व भांडण सोडवण्यासाठी आलेले संतोष यांचे भाऊ सागर त्यांनादेखील मारहाण केली.

पोलिसांनी तानाजीला अटक केली असून.याप्रकरणी पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button