breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘गणपतीमध्ये डॉल्बी लावणारच!’, उदयनराजेंनी थेट पोलिसांनाच दिलं आव्हान

वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असणारे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उदयनराजे दणक्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी थेट पोलिसांना आव्हान दिले आहे. गणेशोत्सवादरम्यान डिजे लावणारच असे सांगत उदयनराजेंनी थेट कायदा मोडण्याची भाषा केली आहे. साताऱ्यामधील एका गणपती आगमन सोहळ्यामध्ये त्यांनी कायद्याची भिती न ठेवता डीजे लावण्याचा आदेशच आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. उदयनराजे स्टाइल डायलॉगबाजी करत त्यांनी, ‘जब तक हैं जान तब तक डॉल्बी रहेगी’ असे सांगितले. आपण खरे गणेशभक्त असल्याने दणक्यातच गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर करत थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. आता यावर पोलिस काय भुमिका घेतात हे गणेशोत्सवादरम्यान कळेलच.

काय म्हणाले उदयनराजे

सातारा शहरामध्ये एका गणपती आगमनावेळी उदयनराजेंनी तेथे उपस्थित असणाऱ्या गणेश भक्तांना आणि कार्यकर्त्यांशी स्टेजवरुन संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी डॉल्बी लागलीच पाहिजे असे मत व्यक्त केले. ‘२३ तारखेला विसर्जन आहे तेव्हा पाहू काय होतं आणि काय नाही होतं आणि कसं नाही होतं. डॉल्बी लागलीच पाहिजे, डेसीबल ठरवणारे कोर्ट आणि पोलिस खाते कोण
आहेत? डेसीबल ठरवतात तुमच्या आमच्यासारखे अवली लोक असे मत उदयनराजे यांनी मांडताच कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्यांच्या वक्तव्याला समर्थन दिले. पुढे बोलताना एक दोन दिवस त्रास झाला तर सहन करायला हरकत नाही असेही ते म्हणाले. आम्ही खरे गणेशभक्त आहोत. गणपतीला त्रास होत नाही तर इतरांना त्रास व्हायचं काही कारणच नाही. आणि तरीही त्रास झालाच तर एक दोन दिवस सहन केल्यास काही जात नाही असं उदयनराजे म्हणाले.

सुसंस्कृत पोरांचं ऐकतं नाहीत

यावेळी मोठ्या आवाजाच्या दुष्परिणामांवरही उदयनराजेंनी भाष्य केलं. मोठ्या आवाजाने बिल्डींग पडतात, हे पडतं… ते पडतं… या असल्या साऱ्या गोष्टी खोट्या आहेत. आणि तसं असेलच तर जुन्या इमारती पाडण्यासाठी याचा वापर करा असा अजब सल्लाही त्यांनी दिली. बिचाऱ्या “सुसंस्कृत पोरांचे” हट्ट तुम्ही ऐकून घेत नाही. यासंदर्भात काय करायचं हे आमच्या पद्धतीने पाहिलं जाईल असं सांगतच ही धमकी नाही तर समज देतोय अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली. भाषणाच्या शेवटी त्यांनी थेट पोलिसांनाच आवाहन दिले. प्लॅन करा नाहीतर तुम्ही कोणत्याही कोर्टात जावा डॉल्बी तर असणारच आहे. जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी. जब तक गणपती रहेगा तब तक डॉल्बी रहेगी असं म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.

नांगरे पाटलांची तंबी

उदयनराजेंच्या या आव्हान देणाऱ्या भाषणानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी काद्याचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी न्यायालय आणि पोलिसांच्या आदेशाचे पालन करुन कायदयाचा आदर करावा कुठेही डॉल्बी लावू देणार नाही अशी तंबीही त्यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button