breaking-newsआंतरराष्टीय

उत्तर कोरियाने अणवस्त्र चाचणी तळ केला नष्ट

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाने त्यांचा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केला आहे. कोणाच्याही मनात संशय राहू नये यासाठी खास परदेशी पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते. गुरुवारी पत्रकारांच्या उपस्थितीत स्फोट घडवून उत्तर कोरियाने त्यांचा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केला. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन पुढच्या महिन्यात सिंगापूरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. त्याआधी उचलण्यात आलेले हे महत्वाचे पाऊल आहे.

विविध आर्थिक आणि अन्य निर्बंधांचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियाने आपल्या आक्रमकतेला लगाम घातली असून कट्टर हाडवैर असलेल्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेबरोबर चर्चा सुरु केली आहे. उत्तरपूर्वेला डोंगररांगांमध्ये उत्तर कोरियाचा हा चाचणी तळ होता. उत्तर कोरियाच्या अणवस्त्र चाचण्या संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय होत्या. मागच्या काही वर्षात उत्तर कोरियाने सातत्याने अणवस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्याने जागतिक तणाव निर्माण झाला होता.

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. उत्तर कोरियाकडून सातत्याने अमेरिकेला अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली जात होती. पण आता उत्तर कोरियाने अणवस्त्र चाचणी तळच नष्ट करुन संपूर्ण जगाला सकारात्मक संदेश दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button