breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

क्वॉरंटाईन सेंटरमधील नागरिकांनी आत्महत्येचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे! (व्हीडिओ)

मोशीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये सुविधांचा अभाव

महापालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मोशी येथील ई- प्रभागांतर्गत् असलेल्या आदिवासी विद्यार्थी वसतीगृहामध्ये सुमारे ५० हून अधिक नागरिकांना अलगीकरण केले आहे. मात्र, याठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. काही नागरिकांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

       दरम्यान, सोशल मीडियावर या संदर्भातील एक व्हीडिओ व्हायरल झाला. त्याची दखल पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने घेतली. अधिकारी कामाला लागले आणि नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आणि सहायक आयुक्त आण्णा बोदाडे यांनी सेंटरकडे धाव घेतली. तेथील नागरिकांना सोयी-सुविधा तात्काळ देण्याचे आश्वासन दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button