breaking-newsक्रिडा

क्रीडानगरीतील व्यवस्थांचा विभागीय आयुक्‍तांकडून आढावा

पुणे – खेलो इंडिया 2019 क्रीडा स्पर्धांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुण्याचे प्रभारी विभागीय आयुक्त आनंद लिमये यांनी महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीस भेट दिली. यावेळी खेलो इंडियाची संयोजन समिती, क्रीडा अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व व्यवस्थांचा आढावा घेत तयारीबाबत संपूर्ण माहिती घेतली.

यावेळी राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, राज्याच्या क्रीडा व शिक्षण विभागाचे उपसचिव आणि खेलो इंडिया संयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार आदी यावेळी उपस्थित होते. क्रीडानगरीतील बॅडमिंटन, ऍथलेटिक्‍स, जिम्नॅस्टिक्‍स, टेबलटेनिस, ज्युदो, कुस्ती संकुल यांसह विविध स्टेडियम्स, नेमबाजी केंद्र, खेळाडू व पदाधिका-यांच्या निवास आणि भोजन व्यवस्थांच्या तयारीबाबत तसेच तेथील सुविधा, सोयींबाबत त्यांनी आढावा घेतला. स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा बॅडमिंटन सभागृहात होणार आहे या बाबद त्यांनी माहिती घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button