breaking-newsमनोरंजन

दीपिकाने वापरलेले स्पोर्ट्स एडिटमधील निवडक कपडे आणि वस्तू घेता येणार विकत

राष्ट्रीय खेळ दिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री दीपिका पादुकोणने स्पोर्ट्स एडिट संग्रह खुला केला आहे. यातून जमा होणारा निधी तिच्या द लाईव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन या मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी देण्यात येणार आहे. याची घोषणा नुकतीच अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया हैंडलवरून केली असून आपल्या काही, स्पोर्ट्सवेअर मधील छायाचित्रांना यावेळी शेअर केले आहे.

या संग्रहाचे अनावरण राष्ट्रीय खेळ दिवसाचे औचित्य साधून करण्यात आले असून यामध्ये दीपिकाच्या वैयक्तिक संग्रहातून निवडक कपडे तसेच, खेळाचे कपडे, खेळ साधने यांचा समावेश असणार आहेत. स्टेपल टीजपासून परफॉरमन्स ओप्टीमायझिंग वर्कआउट साधनांपर्यंत सर्व काही या ‘स्पोर्ट्स एडिट’ संग्रह, ही चाहत्यांसाठी एक मोठी ट्रीट असणार आहे. या संग्रहामध्ये काही लिमिटेड एडिशन स्नीकर्स देखील आहेत, ज्यावर चाहत्यांच्या अक्षरशः उड्या पडतील. या कलेक्शनमध्ये बाजारात सर्वाधिक मागणी असलेला एक विशेष पीस ‘ऑल हॉलो ईव’ पेअर, देखील असणार आहे.

एक उत्साही फिटनेसप्रेमी आणि खेळांची चाहती असल्यामुळे, दीपिकाने नेहमीच आपल्या चाहत्यांना स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी प्रेरित केले आहे. या संस्करणाच्या निमित्ताने, दीपिका तिच्या चाहत्यांना स्वस्थ जीवन जगण्याचा मार्ग आणि निरोगी आरोग्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी प्रेरित करणार आहे.

हे कलेक्शन 29 ऑगस्टपासून DeepikaPadukone.com/Closet वर उपलब्ध झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button