breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोल्हापुरात कोरोना कक्षातील वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय अर्थीत सीपीआरमधील कोरोना कक्षातील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना कक्षातील 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट असलं, तरी कोरोना कक्षात मृत्यू झाल्याने, कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे.

हा रुग्ण हातकणंगले तालुक्यातील होता. या रुग्णाला कोरोना संशयित म्हणून उपचारासाठी दाखल केलं होतं. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवला आहे, मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठलं. हा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. जर त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असेल, तर कोल्हापूरमध्ये अधिक खबरदारी घेण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या तीनवर पोहोचली आहे. कोल्हापुरामधील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या बहिणीलाही कोरोना झाल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झालं. पुण्याहून कोल्हापूरला नातेवाईकाकडे आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या बहिणीला संसर्ग झाल्याने, कोल्हापुरातील कोरोनाबाधितांची संख्या तीनवर पोहोचली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button