breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये थेट सोसायटीत शेतकऱ्याला भाजी विक्रीसाठी परवानगी

पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांनी थेट शेतकऱ्यांना भाजी विक्रीसाठी सोसायटीत बोलावलं आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळत रहिवाशांनी भाज्या खरेदी केल्या. रहाटणीतील लेगसी ऑरा सोसायटीत हा उपक्रम राबवण्यात आला आहे. रहिवाशांच्या या नव्या कल्पनेमुळे पिंपरी-चिंचवडमधील इतर सोसाट्यांनीही ही कल्पना राबवावी असं स्थानिकांकडून आवाहन करण्यात आलं आहे.

एकीकडे मुंबई आणि पुण्यात भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आरहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील सोसायट्यांनी सोशल डिस्टन्स पाळत एक नवा उपक्रम राबवला.

पिंपरी-चिंचवडमधी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही आता कमी झालेली दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आज पुन्हा पाच कोरोनाग्रस्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांना रुग्णालयातील नर्स, डॉक्टर आणि स्टाफने टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला. तसेच दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज दिलेले तीन आणि आजचे पाच असे एकूण पिंपरीत आठ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button