breaking-newsराष्ट्रिय

कोलकात्यातील स्फोटात एक ठार

  • नगरबझार उपनगरातील घटना; ९ जण जखमी

कोलकात्यातील उत्तर उपनगरातील नगरबझार येथे मंगळवारी एका बहुमजली इमारतीच्या समोर कमी तीव्रतेचा स्फोट होऊन एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले.

बराकपूर आयुक्तालयाचे पोलिस उपायुक्त आनंदा रॉय यांनी सांगितले, की या स्फोटात जखमी झालेल्या एका बालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीनुसार इमारतीबाहेर करण्यात आलेल्या स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला. या इमारतीत दक्षिण डमडम नगरपालिकेचे अध्यक्ष पंछू रॉय यांचे कार्यालय आहे. हा सॉकेट बॉम्बचा स्फोट असून सीआयडीचे बॉम्ब शोधक पथक तिथे गेले असून तपास सुरू आहे. आम्ही अजून चौकशी करीत आहोत.

इमारतीतील फळाच्या दुकानाच्या बाहेर काझीपारा भागात हा स्फोट सकाळी नऊ वाजता झाला. सुरुवातीला तो गॅस सिलिंडरचा स्फोट आहे असे वाटले पण तसे नव्हते. या वेळी बॉम्बमध्ये खिळे व बंदुकीची दारू सापडली.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांने सांगितले, की मला ठार मारण्याचा हा कट होता. यात त्यांनी कुणा पक्षाचे नाव घेतले नाही. ज्या शक्ती तृणमूलवर हल्ले करीत आहेत, त्यांचेच हे कारस्थान आहे. हा स्फोट पूर्वनियोजित होता व त्यांना मलाच मारायचे होते. त्यातून भीती पसरवण्याचा त्यांचा हेतू होता. तृणमूलमधील अंतर्गत वादांचा हा परिणाम आहे काय, असे विचारले असता त्यांनी दक्षिण बंगालमध्ये असे वाद नसल्याचे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button