breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोनील औषधावरून दिशाभूल केल्याप्रकरणी बाबा रामदेव यांच्यावर गुन्हा दाखलं

कोरोना व्हायरसवर प्रभावी असं ‘कोरोनील’ औषध शोधल्याचा दावा योग गुरु बाबा रामदेव यांनी केला आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदाने हे औषध तयार केलं असून यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.त्यातच आता बाबा रामदेव यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बाबा रामदेव यांच्यासह चौघांविरोधात जयपूरमधील पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

जयपूरच्या ज्योती नगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदच एमडी आचार्य बाळकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कोरोनील औषधावरून लोकांची दिशाभूल करणारा प्रचार केल्यामुळे ही तक्रार नोंदवण्यात आली असल्याचं यात म्हटलं जात आहे. बलराम जाखर या गृहस्थांनी हा एफआयआर दाखल केला आहे…

याता यावर पुढील कारवाई काय होणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button