breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: पश्चिम रेल्वेच्या ९ कर्मचाऱ्यांना लागण

पश्चिम रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याला शुक्र वारी करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे करोनाची लागण झालेल्या मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची संख्या ९ झाली आहे. यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसह, डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल येथील विद्युत विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला २० एप्रिलला रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची चाचणी के ल्यानंतर करोनाची लागण झाल्याचे समोर आले. कामावर असताना त्यांच्या संपर्कात आलेल्या काही कर्मचाऱ्यांचीही माहिती घेण्यात आली आहे. त्यांना घरातच अलग राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button