breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्या ४२ डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह

पिंपरी| महाईन्यूज| प्रतिनिधी

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात कोरोनाची लागण झालेला रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील ४२ डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना घाबरायचे कारण नाही.

पिंपरी-चिंचवड मधील ६ जणांना ४ एप्रिल या एकाच दिवशी कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये दिल्लीत तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या ४ जणांचा आणि अमेरिकेतून आलेल्या एका रुग्णाचा तसेच पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा समावेश होता.

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल रुग्ण हा रिक्षाचालक आहे. अपघातात जखमी झाल्याने तो या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. रुग्णालयात त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आले. मात्र, ऑपरेशन करताना जखमी रिक्षाचालकाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याच्या घशातील द्रव घेऊन ते पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

तपासणी अहवालात त्याला कोरोनाची लागण झाल्याने डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात एकच खळबळ उडाली. या रुग्णाला तातडीने वायसीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र ऑपरेशन दरम्यान डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी या रुग्णाच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले.

या सर्वांना रुग्णालय प्रशासनाने सुरक्षित स्थळी क्वॉरंटाईन केले. या सर्वांच्या घशाचे द्रव तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आले होते. तपासणी अहवाल महापालिका प्रशासनाला प्राप्त झाला असून, ४२ डॉक्टरांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता अन्य ५० कर्मचाऱ्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button