breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील ९५३ गरजुंना डब्बे व फुड पॅकेटमधून अन्न वाटप – अतिरिक्त आयुक्त अजित पवार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन परिस्थिती उदभवली आहे. या कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहचविण्यासाठी महानगरपालिका स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समन्वय साधत आहे. या कार्यात सहभागी झालेले स्वयंसेवक स्वतःची काळजी घेऊन प्राप्त परिस्थितीमध्ये आपले योगदान देत आहेत . या यंत्रणेव्दारे शहरातील विविध भागातील सुमारे २९ . ९५३ गरजू व्यक्तींना आज डब्बे ब फुड पॅकेट मार्फत अन्न वाटप करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अजीत पवार यांनी दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत गरजू नागरिकांना अन्न आणि शिधा स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून शहरातील विविध भागात दररोज वाटप करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी देखील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून घरपोच सेवा दिली जात आहे. महापालिकेच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या नेवृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करुन या प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.

या कार्यामध्ये विश्व हिंदू परिषद, इस्कॉन, बजरंग दल, लक्ष्य फाऊंडेशन, राकेश वार्कोडे फाऊंडेशन, समप्रिय, पीसीसीएफ, पोलिस मित्र नागरिक संघटना, अग्रसेन संघटना, शिव भोजन, संस्कार सोशल फाऊंडेशन, धर्म विकास संस्था सहभागी झाल्या आहेत. महापालिकेच्या वतीने रोजगार नसना-या अथवा स्थलांतरीत मजूरांसाठी ११ ठिकाणी निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. त्यामध्ये २१३ नागरिक राहत असून आज त्यांनाही निवारा व भोजनासह वैद्यकीय तपासणीची सुविधा महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ऊर्दु शाळा खंडोबामाळ आकुर्डी येथे ७८, व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केशवनगर विद्यालय येथे ३६, ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालय येथे २१, इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, भोसरी येथील संकुलात ४३. ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दापोडी येथील हुतात्मा भगतसींग विद्यालय येथे १८ तर पिंपरी येथील रात्र निवारा केंद्रात १७ असे एकूण २१३ स्थलांतरीत मजुरांची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button