breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोना रुग्णांवर उपचार, पुण्यातील सिस्टरला मोदींचा फोन, दिली कौतुकाची थाप

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या छाया सिस्टला फोन केला आणि त्यांचं कौतुक केलं. सगळा देश तुमचा कृतज्ञ आहे असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांच्या कौतुकाने छाया सिस्टर भारावून गेल्या आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. या दोन्ही शहरांतल्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी जोखीम पत्करत आपली सेवा देत आहेत, रुग्णांवर उपचार करत आहेत. याच सगळ्या कर्माचाऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून मोदींच्या आवाहनानंतर सगळ्या देशाने त्यांचं थाळी आणि घंटानाद करत अभिवादन केलं होतं. 

काय सिस्टर कश्या आहात? असा प्रश्न मोदींनी त्यांना मराठीतूनच विचारला. तुम्ही काळजी घ्या, तुमच्या कुटुंबीयांचीही काळजी घ्या असं ते सिस्टर छाया यांना म्हणाले. तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहात. तुमचे अनुभव कसे आहेत  असंही त्यांनी छाया यांना विचारलं. त्यानंतर छाया यांनी त्यांचे अनुभव पंतप्रधानांना सांगितले.

आम्ही आमचं कर्तव्य करत आहोत. तुम्ही सगळ्या देशाचा कारभार बघता, एवढे व्यस्त असुनही तुम्ही फोन करून आम्हाला धीर दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद असं छाया सिस्टर पंतप्रधानांना म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button