breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये कडक निर्बंध; सायंकाळी 6 ते सकाळी 6 संचारबंदी

पिंपरी |महाईन्यूज|

लॉकडाऊन नको पण, निर्बंध कडक करावेत; राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सभा, मिरवणुका टाळाव्यात; कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढवावे; रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर निर्बंध लावावेत, असा सूर पालकमंत्री अजित पवार व विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या समवेत आयोजित लोकप्रतिनीधी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत उमटला. त्यानंतर पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (दि. ३) सायंकाळी सहापासून कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात पुढील १४ दिवस कठोर निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, महापालिका आयुक्त राजेश पाटील आदी उपस्थित होते. शनिवार सायंकाळी सहापासून सकाळी सहापर्यंत संचारबंदी व दिवसा जमाव बंदी आदेश लागू केला जाणार आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा, वर्तमानपत्रे आणि पार्सल सेवा वगळता सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. हॉटेल्स, बियर बार, मॉल्स रेस्टॉरंट सात दिवसांसाठी बंद राहतील, असे निर्णय घेण्यात आले.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोनाबाबत सद्यस्थिती मांडली. ते म्हणाले, ‘‘लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार आहेत. पुणे विभागात ऑक्सिजनचा काही प्रमाणात तुटवडा भासत आहे. महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. सर्व शाळा ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. हॉटेल्स रात्री आठ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी असेन. लग्न, कौटुंबिक कार्यक्रम, अंत्यविधी आणि इतर सामाजिक धार्मिक कार्यक्रमांसाठी बंदिस्त हॉलमध्ये २० ते ५० व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी दिली जाईल. बस आणि इतर वाहतुकीच्या क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी घेण्याच्या अटीवर परवानगी असेल. अत्यावश्यक सेवा वगळून रात्री संचारबंदी असेल. उद्याने सायंकाळी पूर्णपणे बंद राहतील.’’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button