breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोना उपचारात अँटिबायाेटिक्सचा जास्त वापर जीवघेणा : डब्ल्यूएचओ

जिनेव्हा | कोरोनाचा सामना करण्यासाठी अँटिबायोटिकच्या जास्त वापरावर डब्ल्यूएचओने इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयेसस यांनी माध्यमांना सांगितले की, अँटिबायोटिक्स औषधांच्या जास्त वापरामुळे धोकादायक विषाणूची प्रतिकारक्षमता वाढते. तो जीवघेणा ठरू शकतो. खरे म्हणजे अँटिबायोटिक्स औषधांच्या सेवनाने काही काळानंतर विषाणू मजबूत होतात. गेब्रेयेसस यांनी सांगितले की, केवळ त्याच कोरोना रुग्णांच्या उपचारात अँटिबायोटिक औषधांची गरज असते, ज्यात विषाणूच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. असे रुग्ण कमी असतात. कमी गंभीर कोरोना रुग्णांना अँटिबायोटिक थेरपी द्यायला नको. गेब्रेयेसेस यांनी सांगितलेे की, अँटिमायक्रोबायल प्रतिकार करण्याचा धोका ही आपल्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. जगाने गंभीर पद्धतीने अँटिमायक्रोबायल औषधांचा वापर करण्याची क्षमता गमावली असल्याचे स्पष्ट आहे. तर अनेक गरीब देशांमध्ये या औषधांचा खूप वापर होत आहे. डब्ल्यूएचओचे कार्यकारी संचालक माइक रियान यांनी इटलीच्या डॉक्टरचा दावा फेटाळत सांगितले की, कोरोना कमजोर झालेला नाही. यामुळे हलगर्जी करायला नको. इटलीचे वरिष्ठ डॉ. अल्बर्टो जँगरिलो यांनी सांगितले होते की, त्यांच्या देशात वैद्यकीयदृष्ट्या कोरोनाचे अस्तित्व संपले आहे. गेल्या दहा दिवसांत केलेल्या स्वॅब टेस्टमध्ये हे आढळले आहे. डब्ल्यूएचओच्या एपिडेमियोलॉजिस्ट मारिया वान यांनीही सांगितले की, आतापर्यंत पुरावा आढळला नाही की, ज्यात म्हणता येईल की कोरोनाची स्थिती बदलली आहे. कोरोनाचा प्रसार पूर्वीप्रमाणेच होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button