breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनावर मात करणा-या व्यक्तीला निगेटिव्ह असल्याचा दाखला द्यावा – जितेंद्र ननावरे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोव्हिड आजारावर मात केलेल्या रुग्णांना पूर्ण बरे झाल्याचा अथवा कोव्हिड निगेटिव्ह असल्याचा दाखला देण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात ननावरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड मनपा रुग्णालयात पॉजिटीव्ह कोरोना रुग्ण आल्यानंतर त्याचे उपचार केल्यानंतर तो पूर्णपणे बरा होतो. त्यानंतर त्याला घरी सोडताना त्याच्या डिस्चार्ज कार्ड वर तो निगेटिव्ह आहे, असा शिका असावा किंवा तो पुर्णपणे बरा झाला आहे, असा त्याच्यात उल्लेख करणे गरजेचे आहे. कारण रुग्ण पुर्णपणे बरा झाला म्हणून त्याच्याकडे काहीही पुरावा नसतो. त्याच्यामुळे एम. आय. डी. सी.मध्ये काम करणारा कामगार वर्ग किंवा ऑफिसमध्ये काम करणारा कामगार वर्ग यांना ते पूर्णपणे बरे झाले आहेत, याचा काही पुरावा नसल्याने त्यांना कामावर रुजू करून घेत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

कामगारांना निगेटिव्ह रिपोर्ट आणल्यानंतरच कामावर घेण्यात येईल, असा फतवा कंपन्या व संस्थांनी काढला आहे. त्यामुळे कामगार वर्गात मोठ्या प्रमाणावर निराशा निर्माण झाली आहे. कोरोना रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला तो पुर्ण बरा झाला आहे, हे सिद्ध करता येत नाही. म्हणुन कोरोना पॉजिटीव्ह कामगार बरे झाल्यानंतर त्यांना काहीही पुरावा नसल्याने मोठ्या आर्थिक व सामाजिक अडचणीला सामोरे जावे लागते आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोना रुग्ण पुर्ण पणे बरे झाल्यानंतर त्याला तो पुर्ण बरा झाला आहे, हे सिद्ध करण्यासाठी तो निगेटिव्ह असल्याचा पुरावा द्यावा. किंवा तसे प्रपत्र देण्यात यावे. अथवा, कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना रुजु करून घेण्याबाबत आदेश काढावा, अशी मागणी माजी नगरसेवक ननावरे यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button