breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाने मृत पावलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना आयुक्तांकडून न्याय मिळेना

– मनसे शहर सचिव रुपेश पटेकर यांचा आरोप

– ५० लाख त्वरित देण्याची मागणी

पिंपरी | प्रतिनिधी

कोरोनाने पिंपरी चिंचवड़ महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यांच्या नातेवाईकांना शासनस्तरावर मदत घोषित झाली. मात्र ही मदत केवळ कागदोपत्री राहिली. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित ५० लाखाची रक्कम द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव रुपेश पटेकर यांनी केली. या बाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात नमुद केले आहे की, पिंपरी चिंचवड़ शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यामुळे शहरात संचारबंदी लागु करण्यात आली. त्यामध्ये अनेक लोक आपल्या कुटुंबासह मूळ गावी गेले. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यासह अनेक कर्मचारी कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी सुसज्ज झाले. त्या दरम्यान अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. या मध्ये अनेक कर्मचारी मृत्युमुखी पडले. घरातील कर्ता माणुस गेल्याने नातेवाईकांना उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न पडला. केंद्र व राज्य सरकारने कोरोना काळात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमा योजना लागु केली.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सुमारे २४ कोरोनात मृत पडलेल्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे अजुनही शासन दरबारी पोचलेले नाहीत. शहरात कोरोना योध्यांचा सत्कार केला जात आहे. मात्र कोरोनाने मृत झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना अद्याप न्याय मिळाला नाही. त्यामुळे केंद्र सरकारची २५ व राज्य सरकारची २५ लाखाची रक्कम त्वरित नातेवाईकांना द्यावी, अशी मागणी पटेकर यांनी केली. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी सेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पटेकर यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button