breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या चिनी चाहत्यांसाठी आमिर खानचा भावनिक संदेश

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या चिनी प्रेक्षकांसाठी आमिर खाननं भावनिक संदेश दिला आहे. या व्हिडिओ संदेशाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताबाहेर चीनमध्ये आमिरचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. चीनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला आमिर हा कदाचित पहिलाच  बॉलिवूड स्टार असेल. आमिरनं भावनिक संदेश देत चिनी चाहत्यांना काळजी घेण्याची विनंती केली आहे. 

‘मी कोरोनाच्या बातम्या वाचल्यापासून अस्वस्थ आहे आहे, मला तिथल्या लोकांची काळजी वाटत आहे. तिथे असलेल्या माझ्या मित्रांच्या मी संपर्कात आहे. कोरोनामुळे ज्यांनी आपली जवळची व्यक्ती गमावली त्या प्रत्येकाच्या दु:खात मी सामिल आहे.  हा खूप कठीण काळ आहे, पण मला खात्री आहे यातून नक्कीच तोडगा निघेल. तिथली यंत्रणा या परिस्थितीवर  नियंत्रण  मिळवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहे, ते यात नक्की यशस्वी होतील. पण आपणही काळजी घेतली पाहिजे, ज्या सूचना करण्यात करण्यात आल्यात त्याची योग्य अमंलबजावणी करत प्रत्येकानं खबरदारी घ्यायला हवी, असं आमिरनं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button