breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालणार बायोसेन्सर; नवं संशोधन

कोलोरॅडो | जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असतानाच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी संशोधकांनी बायोसेन्सर विकसित केला आहे. याचा मोठा फायदा कोरोनाच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी होणार आहे. कोलोरॅडो स्टेट विद्यापीठाच्या संशोधकांनी हा बायोसेन्सर विकसित केला आहे.

शरीरात जेव्हा विषाणुचा संसर्ग होईल तेव्हा हा सेन्सर ब्लू लाइट दाखवेल आणि सामान्य पेशींची वाढ असेल तर ग्रीन लाईट दाखवेल. विषाणू हे सजीव पेशींमध्‍ये संसर्ग करतात. संरक्षक असे प्रथिनांचे कवच व त्यामध्ये जनुकीय घटक अशी साधारण विषाणूंची रचना असते.

प्रथिनां१या कवचाला कॅप्सीड असे म्हणतात या कॅप्सीडच्या आधारावर विषाणुसारख्या कणांचे प्रायॉन्स आणि व्हायरॉइडस असे वर्गीकरण करता येते. विषाणु हे पेशींमधील परजीवीप्रमाणे असतात कारण ते पेशीबाहेर वाढत नाहीत. विषाणू हे त्यांच्या पेशींच्या राइबोझोम्सवर जबरदस्तीने प्रथिने तयार करतात.

अशा स्थितीत आरएनएचा प्रसार होताच हे बायोसेन्सर चमकेल. आणि प्रथिनांसोबत जोडलेल्या विषाणूंच्या बीट्सला तो जोडला जाईल, असे बायोसेन्सरचे कार्य राहील. नेचर स्ट्रक्चर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी यात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. एखाद्याच्या शरीरात विषाणुचा प्रसार किती झाला आहे. हे समजण्‍यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

प्राध्यापक टीम स्टेसेविच यांच्या प्रयोगशाळेतील संशोधकांचा या संशोधनात समावेश आहे. जे बायोेकेमिकल आणि आण्विक जीवशास्त्र विभागाशी संबधित आहेत. यासह केमिकल आणि बायॉलॉजीकल इंजिनीअरींग विभागाचे प्राध्‍यापक ब्रेन मुस्की आहेत. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ जनरल मेडिसीन अँड डब्लू. एम. केकद्वारे अर्थसहाय्य देण्‍यात आले आहे.

ब्रेन मुन्स्की यांच्या प्रयोगशाळेतील पदवीधर विद्यार्थी अमंडा कोच या सेन्सरवर वर्षभरापासून काम करत आहे. यासह या टीममधील लुईस ॲग्वेलेरा यांनी या सेन्सरला व्हिज्युवलाइज करणारे एक संगणकीय मॉडेल तयार केलं आहे. कोरोनाच्या संशोधनात हे मॉडेल वापरण्‍याची तयारी आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या शरीरातील विषाणुच्या संसर्गाची पद्धती ओळखण्‍यासाठी हे मॉडेल उपयोगी ठरणार आहे, असा विश्चास कोच यांना वाटतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button