breaking-newsपिंपरी / चिंचवड

निवृत्त कर्मचा-यांनी महापालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले – महापौर माई ढोरे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

सेवानिवृत्त कर्मचा-यांनी आपल्या प्रामाणिकपणा, शिस्त व सचोटीने महापालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले, त्याबद्दल सेवानिवृत्त कर्मचा-यांचे आभार मानुन महापालिकेतील काम करणा-या कर्मचा-यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे मत महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

सप्टेंबर २०२० अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त व स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचा सत्कार महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज दि.३०/९/२०२० रोजी करण्यात आला. यावेळी कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघ अध्यक्ष अंबर चिंचवडे, पदाधिकारी अविनाश ढमाले, बाळासाहेब कापसे, गणेश भोसले, अविनाश तिकोणे उपस्थित होते. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-यांमध्ये – डॉ. वीणादेवी गंभीर, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, तालेरा रुग्णालय, अलका लोंढे, उपलेखापाल, मु.ले.प.कार्यालय, विजय अवचट, मुख्य लिपिक, कायदा विभाग, सुचिता यादव, उपशिक्षिका, प्राथमिक शाळा, रेहाना खतिब, सहाय्यक शिक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग, देवानंद घुगे, वीजतंत्री, ब क्षेत्रीय कार्यालय, दत्तात्रय गाजरे, वाहन चालक, विद्युत मुख्य कार्यालय, शामकांत हिंगे, वाहन चालक, ग क्षेत्रीय कार्यालय, द्रौपदी सावंत, मुकादम, अ क्षेत्रीय कार्यालय, चित्रा बालवडकर, मुकादम, ब क्षेत्रीय कार्यालय, विवेकानंद काळेल, रखवालदार, अब्दुलगफार खान, मजूर, क्रीडा विभाग, बाबासाहेब शितोळे, मजूर, ह क्षेत्रीय कार्यालय यांचा समावेश आहे.

तर, स्वेच्छा सेवानिवृत्त घेणा-यांमध्ये – सुभाष शिंदे, मुख्य लिपिक, क क्षेत्रीय कार्यालय, बेबी मोरे, उपशिक्षक, गौस सय्यद, वीजतंत्री, अ क्षेत्रीय कार्यालय, रंजना गांधीले, मुकादम, अ क्षेत्रीय कार्यालय, बेबी राखपसरे, सफाई कामगार, ह क्षेत्रीय कार्यालय, देवम्मा धोत्रे, सफाई कामगार, फ क्षेत्रीय कार्यालय, उषा कापसे, सफाई कामगार, ड क्षेत्रीय कार्यालय, बाळु सातपुते, सफाई सेवक, अ क्षेत्रीय कार्यालय, मदन मोटा, सफाई सेवक, ब क्षेत्रीय कार्यालय, मारुती थोरवे, कचरा कुली, ड क्षेत्रीय कार्यालय, दिपक खासनिस, कचरा कुली, अ क्षेत्रीय कार्यालय, मोहन सुरवसे, कचरा कुली, फ क्षेत्रीय कार्यालय यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button