breaking-newsराष्ट्रिय

मतदानाच्या ४८ तास आधी जाहीरनामा प्रसिद्धीस बंदी

निवडणूक आयोगाचे आदेश

मतदानाच्या ४८ तास आधी पक्षांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करू नये, असे निवडणूक आयोगाने शनिवारी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने आता जाहीरनामा प्रसिद्ध करणे हा आचारसंहितेचाच एक भाग केला आहे. एका किंवा अनेक टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असल्यास जाहीरनामा प्रतिबंधात्मक कालावधीत प्रसिद्ध करू नये, असे सुधारित आचारसंहितेमध्ये म्हटले आहे.

आतापर्यंत जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या वेळेबाबत कोणताही नियम नव्हता. गेल्या निवडणुकीत भाजपने पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. काँग्रेसने तेव्हा तक्रारही केली होती, मात्र त्या वेळी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबत आचारसंहिता नियम करण्यात आला नव्हता. त्यामुळे आयोग कोणतीही कारवाई करू शकला नाही. मतदानापूर्वी ७२ तास अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास राजकीय पक्षांना मज्जाव करावा, अशी शिफारस निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या पथकाने अलीकडेच केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button