breaking-newsताज्या घडामोडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देशातील पहिल्या ई-न्यायालयाची सुरुवात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देशातील पहिल्या ई-न्यायालयाची सुरुवात करण्यात आली . सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या हस्ते या पहिल्या ई-न्यायालयाचे उदघाटन झाले आहे. न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. दीपंकर दत्ता यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या न्यायालयाचे उदघाटन करण्यात आले आहे. येत्या १ ऑगस्टपासून या न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.

या ऑनलाईन कामकाजामुळे अधिक पारदर्शकता येईल, असे देखील म्हटले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी होऊ शकत नाही. त्यामुळे, सध्याच्या स्थितीत ई-न्यायालय हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.

ई-न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयात खटले दाखल करण्यापासून युक्तिवादापर्यंत सर्वकाही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदा नाशिकमध्ये हे ई-न्यायालय सुरु होत आहे. या ई-न्यायालयाच्या उदघाटनादरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या कार्यक्रमाला उपस्थित होते. कोरोनाच्या काळात न्यायालये बंद होती. मात्र, ई-न्यायालयाच्या माध्यमातून या काळात न्यायालयावर आलेला ताणही काहीसा कमी होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button