breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पर्यावरणपूक दिवाळी साजरी करुया : आमदार महेश लांडगे

‘फेसबूक लाईव्ह’द्वारे पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन

दिवाळीनिमित्त कोरोना योद्घांबाबत व्यक्त केली कृतज्ञता

पिंपरी । प्रतिनिधी
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आपण फटाकेमुक्त आणि पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करुया…असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले.
दिवळीनिमित्त आमदार लांडगे यांनी गुरूवारी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांशी ‘फेसबूक लाईव्ह’ द्वारे संवाद साधला.
आमदार लांडगे म्हणाले की, दिवाळीच्या तेजस्वी पर्वाला सुरूवात झाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनारुपी महासंकटाचा सामना करीत आहोत. आपल्या परिचित- अपरिचित अनेक कुटुंबांना या संकटाचा फटका बसला आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कुटुंबियांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. त्या सर्वांचे स्मरण या सणाच्या निमित्ताने मला होत आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंबांना दिवाळी साजरी करता आली नाही. संबंधित कुटुंबांवर संकट कोसळले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना आनंद साजरा करता येत नाही. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा सहवेदनाही लांडगे यांनी व्यक्त केल्या आहे. तसेच, दिवाळी साजरी करताना ज्यांना दिवाळीचा उत्सव साजरा करता येत नाही, अशा लोकांसोबत यावर्षी दिवाळी साजरी करुन सामाजिक बांधिलकी जपावी, असेही आवाहन लांडगे यांनी केले.
**
प्रशासनाच्या नियमांचे पालन करा…
कोरोनाच्या संकटाला देशातील प्रत्येक नागरिक सामोरा जात आहे. दिवाळी उत्साहात साजरी केली पाहीजे. यात दुमत नाही. मात्र, यावर्षी आपण फटाकेमुक्त आणि पर्यावरणपुरक दिवाळी साजरी केली पाहिजे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. दिवाळी म्हणजे दीपोत्सव असतो. यावर्षीची दिवाळी कोरोनारुपी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी असावी. संकटाला ऐकोप्याने कसे सामोरे जावे. याचा आदर्श पिंपरी-चिंचवड शहराने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत आनंदाचा सण साजरा करावा, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button