breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बोनस- पगारवाढ वाटाघाटी फिस्कटल्या : वीज कामगारांचा ‘लाईटनिंग स्ट्राईक’ अटळ

राज्यातील कामगार, अभियंते, अधिकारी संघटनांची नाराजी

पुणे । प्रतिनिधी

गेल्या १२ वर्षांपासून वीज कर्मचाऱ्यांना बोनस/ सानुगृह अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात आला. मात्र, या वर्षी व्यवस्थापन आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधीमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली. बोनस व पगारवाढ बाबतच्या वाटाघाटी फिक्सकटल्या आहेत. त्यामुळे येत्या १४ नोव्हेंबर रोजी ‘लाईटनिंग स्ट्राईक’करण्यात येईल, अशी माहिती सर्व कार्यकरत कामगार, अभियंते अधिकारी संघटनांच्या वतीने देण्यात आली.

वीज कामगार, अभियंते व अधिकाऱ्यांच्या सर्व २१ संघटनांचे पदाधिकारी व व्यवस्थापनातर्फे उर्जा सचीव व तिनही वीज कंपन्यांचे अध्यक्ष, वित्त संचालक (मा. स.) मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांची गुरूवारी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली.

यावेळी उर्जा सचिव आशिष गुप्ता यांनी बोनस/ सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे संघटनांच्या वतीने १२ नोव्हेंबरपासून राज्यभरात निदर्शने, द्वारसभा आणि १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजलेपासून लाईटनिंग स्ट्राईकची घोषणा केली आहे.

सुमारे दीड तास झालेल्या मिटिंगमध्ये २०१९-२० मध्ये महावितरणला ८२ हजार कोटी महसूल मिळवून दिला आहे. महावितरणला १५० कोटी रुपये व  महापारेषणला १३० कोटी रुपये नफा होउन देखील १ लाख कर्मचारी, अभियंते अधिकारी व सहाय्यकांना बोनस/ सानुग्रह अनुदानापोटी १२० कोटी रुपये देण्यास व्यवस्थापन नकार देत असल्याबाबत कामगार संघटनांनी निषेध नोंदवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button