breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी नेहरूनगरमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील स्वयंसेवकांना ”माझे कुटुंब… माझी जबाबदारी…” अभियानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. त्यांना किट वाटप करण्यात आल्या. यावेळी प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्यास सुरूवात करण्यात आली.

कोरोनावर विजय मिळविण्यासाठी राज्य सरकारने मुंबई आणि पुणे शहरासाठी घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी माझे कुटुंब… माझी जबाबदारी… अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. नगरसेवक राहूल भोसले, समीर मासुळकर, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, प्रभाग अधिकारी आण्णा बोदडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 9 नेहरूनगर याठिकाणी हे अभियान सुरू केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button