breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘कोरोनाची सौम्य लक्षण असेलेल्या रुग्णांना घरी पाठवा’- पुणे मनपाचा मोठा निर्णय

राज्यात मुंबईमध्ये कोरोनाचं प्रमाण कमी झालं असलं तरी पुण्यात मात्र कोरोना रूग्ण सध्या झपाट्याने वाढत आहेत. पुणे शहरात काल म्हणजे १७जुलैला नव्याने १,७०५ कोरोनाबाधितरुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ३४,०४० झाली आहे. पुण्यात रूग्णसंख्या वाढत असताना हाॅस्पिटल्समध्ये नविन रूग्णांसाठी बेडच शिल्लक नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जागा मिळावी, यासाठी आता अत्यंत कडक पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यात खाजगी रूग्णालयांमध्ये बेड्स अडवून बसलेल्या asymptotic रुग्णांना घरी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

पुण्यामध्ये सामान्य कोरोना रुग्णांना उपचार मिळत नाहीत तर दुसरीकडे खासगी रूग्णालयांमधून अतिसौम्यलक्षणं असलेले रूग्ण अकारण बेड्स अडवून बसल्याच्या तक्रारी आहेत. म्हणूनच खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये कोरोनाबाधित म्‍हणून उपचारघेत असलेल्‍या तथापी, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्‍य लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांचे समुपदेशन करुन त्‍यांना घरी पाठवण्‍यात यावं, असे आदेश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी काढले आहे.

कोरोनाची सौम्‍य लक्षणे असलेल्या किंवा कोणतीही लक्षणे नाही मात्र असे रुग्‍णघरी जाण्‍यास नकार देत असतील तर त्‍यांची यादी महानगर पालिका प्रशासनाकडे पाठविण्‍यात यावी, असंही जिल्‍हाधिकारी राम यांनीकळवले आहे.

खाजगी रुग्‍णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेण्‍यासाठी जिल्‍हा स्‍तरावर तपासणी पथक स्‍थापन करण्‍यात आले असून यापथकामार्फत तपासणी करण्‍यात येणार आहे. जर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले किंवा सौम्‍य लक्षणे असलेले रुग्‍ण खाजगीरुग्णालयात आढळून आले तर संबंधित रुग्‍णालयाच्‍या प्रशासनावर साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्यानुसार, कार्यवाही करण्‍यात येईल, असा इशाराही जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button