breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोनाचा तमाशा फडांना फटका, शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ

पुणे |महाईन्यूज|

महाराष्ट्राची लोककला ही तमाशा फडात जपली गेली आहे. पण हाच तमाशा फड आता कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. राज्यातील यात्रा, जत्रा अन उरूस एका पाठोपाठ रद्द झाल्याने तमाशा फडांना कोट्यवधींचा फटका बसला आहे. तमाशाच्या फडांवर अनेक कुटुंबाचं वर्षभराचं आर्थिक गणित अवलंबून असतं. मात्र कोरोनामुळे हे गणित यंदाच्या वर्षी चुकलं आहे. त्यामुळे साडेतीन हजार कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे.

पुण्यातील नारायणगावची तमाशाची पंढरी म्हणून ओळख आहे. गावोगावच्या यात्रा, जत्रा अन उरूस रद्द करण्याचं सत्र सुरु झाल्याने याचा फटका तमाशा फडांवर झाला आहे. 140 सुपाऱ्यांपैकी 75 टक्के सुपाऱ्या आज रद्द झाल्या आहेत. राज्यातील 15 ते 16 जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या अशा 35 तमाशा फडाच्या इथं राहुट्या लागल्यात. याच राहुट्यात प्रत्येक गावातील जत्रेच्या सुपाऱ्या ठरतात. या दोन महिन्यांच्या उत्सवात छोट्या तमाशा फडाला 35 ते 40 लाख तर मोठ्या तमाशा फडाला 75 ते 80 लाख अशी एकूण 25 कोटींचा उलाढाल होते. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे मोठा भुर्दंड या तमाशा फडांना सहन करावा लागत आहे.

यात्रा, जत्रा आणि उरूसमधून मिळणाऱ्या या उत्पन्नाचा तोटा तर आहेच. मात्र जूनपासून सुरु असणाऱ्या तयारीसाठी उचलल्या कर्जाचा डोंगर ही त्यांना आता खुणावू लागला आहे. म्हणूनच ते सरकारला साकडं घालत आहेत. एका तमाशा फडात साधारण 100 कलावंत काम करतात. नारायनगावच्या तमाशा पंढरीत 35 तमाशा फड आहेत. म्हणजे जवळपास साडे तीन हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह या तमाशा फडावर चालतो. पण यंदा करोनाचे सावट असल्याने या साडे तीन हजार कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. नोटबंदी, ओला दुष्काळ, लोकसभा निवडणुका आणि आता कोरोना असं सलग चार वर्षे तमाशा फड आर्थिक विवंचनेत आहे. हे असंच सुरू राहिलं तर महाराष्ट्राची ही लोककला कायमची लुप्त पावेल. त्यामुळे तमाशा फडावरील आर्थिक फेरा आत्ताच दूर करायला हवा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button