ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

#UdayanrajeBhosale : ‘जे कर्म करतो, ते या जन्मीच फेडावं लागतं’, उदयनराजेंची शरद पवारांवर जहरी टीका

सातारा |  मुंबईत शरद पवार  यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी  कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं. चप्पल फेक आणि दगड फेक करण्यात आली. या प्रकरणी १०५ आंदोलकांविरोधात कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हिंसक आंदोलना प्रकरणावरून आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या घरावर झालेल्या हिंसक आंदोलनाचं समर्थन केलं आहे. बरोबर झालंच पाहिजे, करायलाच पाहिजे, अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार झाला, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

कर्म असतं ना कर्म जे आपण जन्म करतो   प्रत्येकजण मला लागू होतं, तुम्हाला आणि सगळ्यांना लागू होतं  यातून कोण वाचत नाही. जे आपण या जन्मी करतो, ते ह्याच जन्मी आपल्याला कुठल्याना कुठल्या पद्धतीने फेडावं लागतं. अजून काय बोलणार, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर जहरी टीका केली.

उदयनराजेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का?, शिवेंद्रराजेंनी टोला लगावत दिलं उत्तर

संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईतील शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल केला. बराच वेळ तिथे संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. अखेर पोलिसांनी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. पण ही खूप मोठी घटना होती. या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि सहआयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केलीय.

राजकीय आखाडा! शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन दिग्गज नेत्यांच्या भर कार्यक्रमात एकमेकांना कोपरखळ्या

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button