breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाकाळात रक्त तुटवडा, वाढदिवसाचा खर्च टाळून घेतले रक्तदान शिबिर – वसंत काटे

पिंपरी / महाईन्यूज

पिंपळे सौदागर येथील बांधकाम व्यावसायिक वसंत काटे यांच्या वाढदिवसानिमित्त यशदा रियाल्टी ग्रुप व उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने सामजिक सुरक्षिततेचे पालन करून रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात सुमारे ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उद्योजक वसंत काटे यांनीही रक्तदान करून साधेपणाने वाढदिवस साजरा करत समाजापुढे आदर्श निर्माण केला.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा कुंदा भिसे, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक व यशदा रियाल्टीचे संचालक संजय भिसे, उद्योजक राजू भिसे, विजय काटे यांच्यासह परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

उद्योजक वसंत काटे म्हणाले की, ‘जगावर कोरोना महामारीचे सावट आहे. कोरोनाच्या भीतीने बहुतांश रक्तदाते रक्तदानापासून वंचित राहताना दिसून येतात. त्यामुळे रक्तपेढीत आवश्यक रक्तसंकलन होत नाही. रुग्णांना उपचारादरम्यान वेळेवर रक्तसाठा उपलब्ध होत नाही. प्रसंगी रुग्ण दगावण्याच्या घटनादेखील घडू शकतात. याचे गांभीर्य ओळखून वाढदिनी रक्तदानाचा विधायक संकल्प केला. यास रक्तदात्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यांचे मनापासून आभार मानतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button