breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिघीतील हॉटेलमध्ये दारुड्याचा धिंगाणा, कस्टमर भयभीत

पिंपरी, (महाईन्यूज) – दिघी येथील मोशी ग्रँड हॉटेलमध्ये दारुड्याने अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घातल्यामुळे तेथील अन्य कौटुंबिक ग्राहकांना चांगलीच भिती बसली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

गणेश सस्ते (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे मद्यधुंद गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी अनंत रामचंद्र गोरे (वय 35, रा. एकता कॉलनी, शास्त्री चौक, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 25) सायंकाळी आठच्या सुमारास गणेश सस्ते हॉटेलमध्ये आला होता. मर्यादेच्या पलीकडे जाऊन त्याने मद्य प्राशन केले होते. त्याचा बोलताना स्वतःवरील ताबा सुटू लागला. मद्याच्या नशेत त्याने हॉटेलमधील ग्लासची तोडफोड केली. अर्धनग्न होऊन धिंगाणा घातला. त्यावेळी अन्य कौटुंबिक ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. त्याने हॉटेलमधील स्टाफला आणि हॉटेल मालकालाही शिवीगाळ केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button