breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘कोण आला रे कोण आला, मोदी-शहाचा बाप आला’, साता-यात राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन

पुणे, महाईन्यूज, प्रतिनिधी

मोदी-शहांच्या एकजुटीला खिंडार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात चांगलेच राण तापवून सोडले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साता-यात आज रविवारी शरद पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्या स्वागतार्थ कार्यकर्त्यांनी ‘कोण आला रे कोण आला, मोदी-शहाचा बाप आला’, अशा घोषणा दिल्या.

साता-याचे उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला उत्तर म्हणून शरद पवार यांनी आज साता-यात राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. युवकांची मोटारसायकल रॅली, पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा परिषद मार्गे बॉम्बे चौकातून कल्याण रिसॉर्ट दरम्यान ही रॅली काढली.

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले आहेत. माजी खासदार उदयनराजे भोसले आणि माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पक्षातून फोडण्यात आले. त्यातच सातारा विधानसभा मतदार संघातील उमेदवार आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विरोधक दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. केवळ दोन शिलेदारांच्या ताकदीवर सातारा जिल्ह्यात भाजपचे आमदार निवडून आणण्याची खेळी भाजपने केली आहे. ही रणनिती फेल ठरविण्यासाठी व उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्या पक्ष सोडून जाण्याने अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी शरद पवार यांनी हा दौरा केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button