breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोंढवा दुर्घटना, आठ जणाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पुणे – कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली अॅल्कॉन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांच्या मृत्यू प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी प्रकरणी या प्रकरणी आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच विपुल आणि विवेक अगरवाल या बिल्डर बंधूंना ताब्यात घेतले आहे. बिल्डर जगदीशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय-64) यांनी पुण्यातील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांची जबाबदारी स्विकारली आहे.

बिल्डर्सविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा..

या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत, असा आरोप होत आहे. या प्रकरणी अॅल्कॉन लॅंडमार्कस रजिस्टर संस्थेचे भागीदार बिल्डर जगदिशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय-64), सचिन जगदिशप्रसाद अगरवाल (वय-34), राजेश जगदिशप्रसाद अगरवाल (वय-27), विवेक सुनील अगरवाल (वय- 21), विपुल सुनील अगरवाल (वय- 21) तसेच कांचन रजिस्टर संस्थेचे भागीदार बिल्डर पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांच्यासह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, लेबर कॉन्ट्रक्टर विरोधात कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संरक्षक भिंत कमकुवत, बेकायदेशीर होती. मजुरांच्या सुरक्षित निवाऱ्याची काळजी न घेणारे बिल्डर आणि निष्क्रिय पालिका अधिकारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button