breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

केईएमम: प्रिन्सचा मृत्यू अपघाती असल्याचा प्राथमिक निष्कर्ष!

महाईन्यूज | मुंबई

केईएममधील हॉस्पिटलमध्ये ईसीजी बिघाडानंतर लागलेल्या आगीत होरपळलेल्या प्रिन्स या तीन महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूची घटना ही अपघात होती, असे प्राथमिक चौकशी अहवालातून समोर आले आहे. चौकशी समितीने या संदर्भातील अहवाल पालिका प्रशासनाकडे सोपवला आहे. मात्र घटनेतील सदोष यंत्र आणि इतर साधने पोलिसांच्या ताब्यात असल्याने पोलिसांच्या चौकशीनंतरच योग्य निष्कर्ष काढता येईल, असेही समितीने स्पष्ट केले आहे.

केईएममधील ईसीजी यंत्राने ६ नोव्हेंबर रोजी पेट घेतल्याने तीन महिन्यांचा प्रिन्स त्यात होरपळला. भाजल्याच्या जखमांमध्ये झालेल्या संसर्गामुळे २२ नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने चौकशी अहवाल आठ दिवसांपूर्वी पालिकेला दिलेला आहे. घटना घडल्यानंतर आठ दिवसांनी समितीची चौकशी सुरू झाली. त्या आधी पोलिसांनी संबंधित यंत्र जप्त करून न्यायवैद्यक विभागाकडे पाठविले होते. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी समितीपुढे काहीच उपलब्ध नव्हते. प्रत्यक्षदर्शी आणि यांत्रिक आणि विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांचे जबाब समितीने नोंदविले. त्यावरून ही घटना अपघात असल्याचे दिसून येते. पोलिसांच्या चौकशीनंतरच अंतिम निष्कर्ष काढता येईल, असे समितीचे प्रमुख डॉ. भारमाल यांनी सांगितले. ‘माझ्याकडे अद्याप अहवाल आलेला नाही. तो पाहून निर्णय घेतले जातील,’ असे पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button