ताज्या घडामोडी

देहूत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला भाविकांची गर्दी, हरिनाम गजरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

देहू येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त आलेल्या भाविकांनी आळंदी मंदिरात श्रींचे दर्शनास हरिनाम गजरात गर्दी केली. रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा-माऊली तुकाराम नामजयघोष करीत भाविकांनी दर्शन घेत जयघोष केला. यावेळी आळंदी परिसरात महिला, पुरुष भाविकांचे गर्दीने रस्ते फुलले होते. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रभावी दर्शन व्यवस्थेने भाविकांचे सुलभ दर्शन झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. इंद्रायणी नदी घाटावर देखील भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर आणि नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात केली.

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात देवस्थानच्या वतीने श्रींचे सुलभ दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. परतीचे प्रवासात भाविकांनी आळंदी दर्शन करीत निघाल्याने मंदिर परिसरात गर्दी होती. इंद्रायणी नदी परिसर घाट, मंदिर रस्ते गर्दीने फुलले होते. भाविक मिळेल त्या वाहनाने तसेच खाजगी वाहनाने ये-जा करताना दिसत होते. पुणे महानगर परिवहन सेवेने देखील भाविकांची व्यवस्था केली होती. यात राज्य परिवहन सेवेने प्रवासी बस सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. मंदिर परिसर आणि इंद्रायणी नदी काठी भाविकांच्या गर्दीने व्यावसायिकांची देखील गर्दी झाली होती. मंदिरात भाविक महिलांचे दागिने चोरी होऊ नये म्हणून आळंदी पोलिसांच्या वतीने समाधी मंदिरात महाद्वार आणि घाटावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर देवस्थानच्या वतीने ध्वनिक्षेपकांवरून महिलांना चोरांपासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. देहू, आळंदी, पंढरपूर देव दर्शन करून काही भाविक यात्रा करीत असतात. या वर्षीही राज्यभरातून भाविकांनी आळंदीतील माऊलींच्या मंदिरात सकाळ पासूनच गर्दी केली होती.

भाविकांना कमी वेळेत सुरक्षित,सुरळीत दर्शन व्यवस्था आणि भाविकांची सुरक्षा यावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. शांतता आणि प्रभावी पोलीस बंदोबस्त यासाठी आळंदी पोलीस ठाण्याचे वतीने पोलीस बंदोबस्त तैनात होता. मंदिराकडे रस्त्यावर दुकानदारांची दुकाने थाटल्याने भाविकांना ये-जा करण्यास काहीसे त्रासाचे झाले. नगरपदक्षिणा मार्गावर दुहेरी वाहतुकीने वाहतुकीचे कोंडीस काही वेळ सामोरे जावे लागले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर मध्ये श्री संत तुकाराम महाराज यांचा हरिनामाच्या गजरात वैकुंठ गमन सोहळा साजरा करण्यात आला. वारकरी सेवा संघ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व संतांच्या पुण्यतिथी समाधी सोहळे सर्व समाजाने एकत्र साजरी करणे या अनुषंगाने श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळ्या निमित्त तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे जळगाव यांचे किर्तन सेवेने व श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कीर्तन सेवा झाली. श्री संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मोहन महाराज शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी कीर्तन सेवेत महाराजांनी तुकोबारायांच्या जीवन चरित्रावर चांगल्या प्रकारे उपस्थित भाविकांना प्रबोधन केले.

श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा देहू मध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असतो. सर्व संतांच्या मंदिरामध्ये सर्व संतांचे समाधी सोहळे पुण्यतिथी साजरी व्हावी या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे विना मंडपात तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा हरिनामाच्या गजरात साजरा करीत पुष्पवृष्टी करण्यात आली. मोहन महाराज शिंदे, एकनाथ महाराज शिंदे, रवींद्र महाराज कुमकर, पृथ्वी कराळे, सचिन महाराज शिंदे, सोपान बुटले, सौरभ बागल, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​  

​देहू येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त आलेल्या भाविकांनी आळंदी मंदिरात श्रींचे दर्शनास हरिनाम गजरात गर्दी केली. रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा-माऊली तुकाराम नामजयघोष करीत भाविकांनी दर्शन घेत जयघोष केला. यावेळी आळंदी परिसरात महिला, पुरुष भाविकांचे गर्दीने रस्ते फुलले होते. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रभावी दर्शन व्यवस्थेने भाविकांचे सुलभ दर्शन झाल्याने भाविकांनी 

देहू येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त आलेल्या भाविकांनी आळंदी मंदिरात श्रींचे दर्शनास हरिनाम गजरात गर्दी केली. रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा-माऊली तुकाराम नामजयघोष करीत भाविकांनी दर्शन घेत जयघोष केला. यावेळी आळंदी परिसरात महिला, पुरुष भाविकांचे गर्दीने रस्ते फुलले होते. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रभावी दर्शन व्यवस्थेने भाविकांचे सुलभ दर्शन झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. इंद्रायणी नदी घाटावर देखील भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर आणि नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात केली.

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात देवस्थानच्या वतीने श्रींचे सुलभ दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. परतीचे प्रवासात भाविकांनी आळंदी दर्शन करीत निघाल्याने मंदिर परिसरात गर्दी होती. इंद्रायणी नदी परिसर घाट, मंदिर रस्ते गर्दीने फुलले होते. भाविक मिळेल त्या वाहनाने तसेच खाजगी वाहनाने ये-जा करताना दिसत होते. पुणे महानगर परिवहन सेवेने देखील भाविकांची व्यवस्था केली होती. यात राज्य परिवहन सेवेने प्रवासी बस सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. मंदिर परिसर आणि इंद्रायणी नदी काठी भाविकांच्या गर्दीने व्यावसायिकांची देखील गर्दी झाली होती. मंदिरात भाविक महिलांचे दागिने चोरी होऊ नये म्हणून आळंदी पोलिसांच्या वतीने समाधी मंदिरात महाद्वार आणि घाटावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर देवस्थानच्या वतीने ध्वनिक्षेपकांवरून महिलांना चोरांपासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. देहू, आळंदी, पंढरपूर देव दर्शन करून काही भाविक यात्रा करीत असतात. या वर्षीही राज्यभरातून भाविकांनी आळंदीतील माऊलींच्या मंदिरात सकाळ पासूनच गर्दी केली होती.

भाविकांना कमी वेळेत सुरक्षित,सुरळीत दर्शन व्यवस्था आणि भाविकांची सुरक्षा यावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. शांतता आणि प्रभावी पोलीस बंदोबस्त यासाठी आळंदी पोलीस ठाण्याचे वतीने पोलीस बंदोबस्त तैनात होता. मंदिराकडे रस्त्यावर दुकानदारांची दुकाने थाटल्याने भाविकांना ये-जा करण्यास काहीसे त्रासाचे झाले. नगरपदक्षिणा मार्गावर दुहेरी वाहतुकीने वाहतुकीचे कोंडीस काही वेळ सामोरे जावे लागले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर मध्ये श्री संत तुकाराम महाराज यांचा हरिनामाच्या गजरात वैकुंठ गमन सोहळा साजरा करण्यात आला. वारकरी सेवा संघ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व संतांच्या पुण्यतिथी समाधी सोहळे सर्व समाजाने एकत्र साजरी करणे या अनुषंगाने श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळ्या निमित्त तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे जळगाव यांचे किर्तन सेवेने व श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कीर्तन सेवा झाली. श्री संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मोहन महाराज शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी कीर्तन सेवेत महाराजांनी तुकोबारायांच्या जीवन चरित्रावर चांगल्या प्रकारे उपस्थित भाविकांना प्रबोधन केले.

श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा देहू मध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असतो. सर्व संतांच्या मंदिरामध्ये सर्व संतांचे समाधी सोहळे पुण्यतिथी साजरी व्हावी या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे विना मंडपात तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा हरिनामाच्या गजरात साजरा करीत पुष्पवृष्टी करण्यात आली. मोहन महाराज शिंदे, एकनाथ महाराज शिंदे, रवींद्र महाराज कुमकर, पृथ्वी कराळे, सचिन महाराज शिंदे, सोपान बुटले, सौरभ बागल, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button