breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र
केंद्रीय पथकाकडून वाळूज औद्योगिक परिसरात पाहणी..
औरंगाबाद : मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबादेतही कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येचे प्रमाण लक्षात घेता, आज शनिवारी 25 जूलै रोजी सकाळी केंद्रीय पथकाने वाळूज औद्योगिक भागात भेट देऊन पाहणी केली. यामध्ये बजाज ऑटो कंपनी, बजाजनगरातील लोकमान्य चौक कन्टेन्मेंट झोन, कामगार भवन आणि बजाज विहार येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पथकाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, त्यावरील उपाय आणि योग्य मार्गदर्शन केले. यानंतर हे केंद्रीय पथक औरंगाबाद शहरात महानगरपालिका हद्दीतील कन्टेन्मेंट झोन आणि कोवीड सेंटरची पाहणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन सदरचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.